राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निकालावरून सत्ताधारी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालावरून राज्यातील जनमत हे सध्याच्या सरकारविरोधी आहे हे स्पष्ट झाल्याचा घणाघात खडसे यांनी व्यक्त केला.
तसेच मी भाजप सोडली हेच भाजपच्या जिव्हारी लागले. त्यामुळेच भाजपवाले माझ्या नादी लागले. मला जेलमध्ये टाकाण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी काय केलं हे तरी सांगा? माझ्यामागे ईडी, सीबीआय लावली जाते,असे म्हणत खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला.सी वोटर सर्व्हेवर आमचा विश्वास नाही, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले होते. यावर बोलताना खडसे यांनी ‘सर्वे झूठ है तो अभी जो निकाल हात में आया वो क्या है?असा सवाल खडसे यांनी उपस्थित करत शिंदे -भाजपवर सरकारवर टीकास्त्र सोडले.
विरोधी पक्षात दम नाही आम्हीच जुनी पेन्शन योजना लागू करू शकतो, असे विधान फडणवीसांनी केले होते.जनतेने फडणवीसांवर विश्वास ठेवला नाही. कारण नोकरदार आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना हवी आहे. तसेच भाजपला नागपूरमध्ये मोठा धक्का बसला. फडणवीस आणि गडकरी यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा पराभव होणे हे दुर्दैवच म्हणावे लागेल. आता या टीकेला सत्तधारी शिंदे गट आणि भाजपा काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.