Latest Marathi News

BREAKING NEWS

तारक मेहता सोडलेला हा अभिनेता डोळे मिटून भक्तीत तल्लीन दिसला

0

लोकप्रिय शो म्हणून ओळखला जाणारा तारक मेहता का उल्टा चष्मा’ ला ओळखलं जातं. गेल्या चौदा वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दयाबेन, जेठालाल ते तारक मेहतापर्यंत यातील सर्वच पात्र प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान काही जुन्या कलाकारांनी या शोला रामराम ठोकला आहे. यातीलच इक कलाकार म्हणजे शैलेश लोढा होय. अभिनेता शैलेश लोढा यांनी आपल्या खास शैलीने आणि अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

अलीकडेच शो मेकर्सवर आपलं उर्वरित मानधन न दिल्याचा आरोप करून ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता शैलेशने सोशल मीडियावर त्याचा एक नवा फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केल आहे. शैलेशला भक्तीमध्ये तल्लीन पाहून चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.तसेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये परत येण्याची विनंती करत आहेत.

शैलेश लोढा यांनी नुकतंच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेता भगव्या रंगाच्या वेशभूषेत दिसून येत आहे. तसेच त्यांनी कपाळावर टिळा आणि भस्म लावला आहे.गळ्यात फुलांची माळ घातली आहे. अभिनेता डोळे मिटून ध्यान करण्याच्या मुद्रेत बसलेला दिसून येत आहे. शैलेश मंदिरात बसल्याचं समजतं. शैलेशने हा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आम्हाला मनाची शक्ती द्या, मनाला जिंकू द्या…’ शैलेशला या अवतारात पाहून चाहते सतत प्रतिक्रिया देत, जय हो, ओम नमः शिवाय, जय श्री राम लिहित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.