सत्यजित दादा,
आपण नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघातून निवडणूक मोठ्या मताधिक्याने आमदार झालात त्याबद्दल आपले प्रथम हार्दिक अभिनंदन. आपल्या कुटुंबाचा व आमच्या कुटुंबाचा गेली 25 वर्षांपूर्वी स्नेह,आपले वडील व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तीर्थरूप डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आणि दुर्गाताई आणि गेल्या अनेक वर्ष आमच्या सहवासात असलेले राजळे कुटुंबीय यामुळे आपल्या कुटुंबाची जवळीक वाढली त्यातून डॉक्टर साहेब हे पदवीधर मतदार संघाच्या माध्यमातून आमदार झाले यामध्ये त्यांचा सेवक होण्याची संधी मला मिळाली.
त्यानंतर आपले आणि माझे संबंध राजाभाऊ मुळे अधिक दृढ झाले ,खरं म्हणजे आपण राजाभाऊ सारखे तरुण तडफदार, अभ्यासू नेतृत्व आहात आणि याचाच अपेक्षेने या मतदारसंघातून मतदारांनी आपल्याला निवडले आहे. डॉक्टरांनी जे काम केले,लोकांचा जो विश्वास संपादन केला, प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी झाले आणि म्हणून आज आपल्या मागे मतदार खंबीरपणे उभे राहिले याचे कारण म्हणजे आपल्या वडिलांवरील विश्वास, आपणही आपल्या राजकारणात आणि समाजकारणात अनेक संघर्ष केले, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता ते युवक काँग्रेसचे अध्यक्षपद आपल्याला या सर्व कष्टातून मिळाले त्यातून आपण आपला हा मतदारसंघ नव्हे तर महाराष्ट्र बांधला याचाही फायदा आपल्याला या निवडणुकीत झाला .आपण खूप काही करावं अशी अपेक्षा निश्चितच या मतदार संघाच्या मतदारांची आहे. शिक्षकांचे प्रश्न आहेत, पदवीधरांची प्रश्न आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. शासकीय व निमशासकीस कर्मचारी व वकील, डॉक्टर या सारख्या असंख्य पदवीधारक मतदारांची खूप मोठी अपेक्षा आपल्याकडून आहे. आपण मोठा लढा देऊन या पदापर्यंत पोहोचला यामागे निश्चित आपले योगदान आहे आपल्याला ते टिकवले पाहिजे आणि या सर्वांचा विश्वास संपादित करण्यासाठी त्यांचे प्रश्न त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे हे जर आपण केले तर निश्चित आपले भविष्य उज्वल असेल याबद्दल शंका नाही
खरं सांगू हा मतदारसंघ आणि या मतदारसंघातील प्रत्येक माणूस हा डॉक्टर यांनी अतिशय मेहनतीने बांधून ठेवला आहे. आणि म्हणूनच आपला हा मोठा विजय झालेला आहे अनेकांनी डॉक्टरांकडे पाहून आपल्याला मतदान केले हे नाकारून चालणार नाही आता आपण सर्वांचेच डॉक्टर आहात. या भावनेतून काम केले तर निश्चितच डॉक्टरांनी जे स्वप्न पाहिले ते पूर्ण होण्यास मदत होईल अशी मला आशा वाटते. मी एवढे बोलू शकलो कारण मी आपल्या परिवारवर प्रेम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या भावनेतून मी हा संवाद साधला आहे .
आपले हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा .
किशोर मरकड, अहमदनगर.