Latest Marathi News

BREAKING NEWS

माझ्यामुळे कोणाच्या कंबरेचा तर कोणाच्या गळ्याचा पट्टा निघाला

0

कोरोना काळात कोरोना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतूनच त्यांचे कामकाज चालायचे. त्यानंतर त्यांना मानेचा त्रास उद्भवला. ते आजारी पडले. त्यांच्यावर सर्जरीही झाली. मानेच्या त्रासामुळे ते घराबाहेर पडत नव्हते. मानेला पट्टा लावून असायचे. उद्धव ठाकरे यांना मानेचा त्रास होत असल्याने नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत झालं. उद्धव ठाकरे यांच्या या आजारपणावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर जोरदार निशाणा साधला.

शिंदे गटाने रविवारी मुंबईतील षण्मुखानंद सरस्वती सभागृहात अल्पसंख्याक समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून अल्पसंख्याक समाज आला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. तसेच मुंबईच्या विकासासंदर्भात सुद्धा त्यांनी यावेळी भाष्य केले.
.
जे विषय सोडवायचे ते पटकन सोडवणार आहे. जे धोरणात्मक निर्णय आहेत. तेही अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवणार आहे. बघत आहे, करत आहे. पाहात आहे हे मी करत नाही. होणारं असेल तर करून टाकतो. आधीचं सरकारही तुम्ही पाहिले. सर्व घरात बसले होते. एकनाथ शिंदे यांनी सर्वांना बाहेर काढलं आहे. सर्वजण फिरत आहेत. जागोजागी जात आहेत. कुणाचा कंबरेचा पट्टा निघाला, कुणाचा गळ्याचा पट्टा निघाला. सर्व निघालं. चांगलंय. चांगलंय. सर्व चांगलं आहे, अशी टीकाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

तुमचं आणि माझं रक्त सारखच आहे. जेव्हा आपण रक्तदान करतो तेव्हा ते हिंदूला जाईल की मुस्लिमांना जाईल हे आपण पाहत नाही. पण काँग्रेस आपल्यात फूट पाडत आहे. मुस्लिम समाज केवळ कुणावर तरी अवलंबून राहावा हेच काँग्रेसचं धोरण राहिलं आहे. त्यामुळे त्यापासून सावध राहा, असं आवाहनही त्यांनी केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.