Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शीच्या डॉ.संजय अंधारे यांनी घडविला इतिहास

0

*”कॉकटेल अँटीबॉडीज” कोरोनाविरुध्दच्या युध्दात “गेमचेंजर”ठरणार!*
*बार्शीच्या डॉ.संजय अंधारे यांनी घडविला इतिहास*

बार्शी,(खमक्या इंडिया नेटवर्क) कोराना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे घाव सोसून जग तिसऱ्या लाटेच्या चर्चेने धास्तावले असतानाच एक सुखावह घटना घडली आहे.मोनोक्लोनल अँटीबॉडीज तथा कॉकटेल अँटीबॉडीज  आधारित उपचार पद्धती कोरोना विरुद्धच्या लढाईत गेम चेंजर ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे युरोप अमेरिके बरोबरच आपल्या देशात दिल्ली आणि काही राज्यात ही उपचार पद्धती यशस्वी झाली आहे‌, महाराष्ट्रात याच उपचार पद्धतीने चार जणांना कोरोनामुक्त करुन महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील सुश्रुत हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. संजय अंधारे यांनी इतिहास घडविला आहे.
बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानचे सक्रीय सदस्य असलेल्या डॉ. संजय अंधारे यांचा प्रतिष्ठानने त्यांनी कोरोना विरोधात स्वतःचा जीव धोक्यात घालून बजावलेली कामगिरी आणि ‘कॉकटेल”उपचार पद्धती अमलात आणून घडविलेला इतिहास, याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, संचालक डॉ. लक्ष्मीकांत काबरा यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संंंं अजित कुंकूलोळ, प्रा किरण गाडवे, मुरलीधर चव्हाण, अशोक हेड्डा, शहाजी फुरडे-पाटील, राजा माने उपस्थित होते.अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी डॉ.अंथारे यांच्या कार्याने बार्शीच्या प्रतिष्ठेत मौल्यवान भर टाकल्याची भावना व्यक्त केली. डॉ.अंधारे यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईचा आढावा घेतला.समाज, वैद्यकीय क्षेत्र आणि शासनाने “गेमचेंजर” उपचाराच्या नियोजन व अंमलबजावणी विषयीच्या त्यांच्या अपेक्षा विस्ताराने सांगितल्या. डॉ.लक्ष्मीकांत काबरा यांनी आभार व्यक्त करताना डॉ.अंधारे यांच्या कार्याचा गौरव गीरव केला.
Leave A Reply

Your email address will not be published.