*Digital Media Editors Journalists Association Maharashtra : Raja Mane appointed as state president, Tulsidas Bhoite as vice president and Nandkumar Sutar as secretary*
नमस्कार,
डिजिटल मिडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था, संपादक, पत्रकार आणि सर्व घटकांचे हित आणि राज्यातील अनेक संपादक, पत्रकार यांच्या सूचना-आग्रहामुळे संघटना स्थापनेचा निर्णय झाला.डिजिटल मिडिया पत्रकारितेतील क्रांतीने तो गतिमान केला.डिजिटल मिडिया क्षेत्राला आणि पत्रकारांना शासन दरबारी अधिकृतता प्राप्त व्हावी, पत्रकारितेची मूल्ये जतन करीत या क्षेत्रात गुणवत्ता व विश्वासार्हता वृध्दिंगत करण्याबरोबरच बदलत्या कायद्याच्या चौकटीत या क्षेत्रातील प्रत्येक घटक सक्षम व्हावा यासाठी प्रयत्न करणे,असे अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवतानाच गावपातळीवर पोहोचलेल्या या माध्यमाच्या अर्थकारणाविषयी जागृती निर्माण करण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न असेल.स्वयंशिस्त आणि स्वतःची आचार संहिता,ही प्रत्येक क्षेत्राची गरज असते.महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला सामाजिक भान, नव्या कायद्याची चौकट,सतत होत राहणारी तांत्रिक क्रांती आणि व्यावसायिक दृष्टिकोन याबाबत ठोस देण्याची गरज आहे.कारण ती दिशाच महाराष्ट्राच्या भविष्यातील डिजिटल मिडियाचा चेहरा आणि संस्कृती निर्माण करणार आहे. *भारतातील या क्षेत्राची व्यापकता अनेक अभ्यास अहवाल अक्षरशः आपले डोळे उघडवितात! भारतीय माध्यमांना कोरोना संकटातही ६२ हजार ३०० कोटी रुपयांचा जाहिरात व्यवसाय मिळाला.त्यात टीव्ही माध्यमांचा वाटा २५हजार १००कोटी रुपये, डिजिटल मिडियाचा वाटा १९हजार १००कोटी रुपये तर प्रिंट मिडियाचा वाटा केवळ १२ हजार १०० कोटी रुपये होता.ही आकडेवारी काय सांगते? २०१७ साली ८ हजार कोटींचा जाहिरात मिळविणारे भारतीय डिजिटल मिडिया क्षेत्र आज २० हजार कोटींचा पल्ला गाठता आहे. २०२५पर्यत हा आकडा ३०हजार कोटी रुपयांच्याही पुढे जाण्याचा अंदाज अभ्यासक वर्तवितात.या संपूर्ण चित्रात आपला महाराष्ट्र आणि ग्रामीण भागातील न्यूज पोर्टल चालविणारा मालक, संपादक, पत्रकार कुठे असणार?त्याचा सहभाग कुठे आणि कसा असणार?* अशा असंख्य प्रश्नांचा वेध डिजिटल मिडिया क्षेत्राला घ्यावा लागणार आहे.तसा प्रयत्न करण्याचा मनोदय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांचा आहे. त्यांची मुहूर्तमेढ पदाधिकारी पहिल्या टप्प्यातील निवडीच्या बातमीनेच रोवली गेली…ती बातमी राज्यातील शेकडो न्यूज पोर्टल्स, यूट्यूब चैनल्स आणि वेबसाईटवर प्रसारित झाली.वाणगी दाखल उदाहरण द्यायचे तर पुण्यातील नितीन पाटील यांच्या “पोलीसनामा”या एकाच समुहाच्या विविध भाषांतील तब्बल अठरा प्लॅटफॉर्मवर बातमी प्रसारित झाली.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
आपला,
*राजा माने*
– संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र.
-संस्थापक संचालक, मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी
-उपाथ्यक्ष,अ.भा.मरठी नाट्य परिषद, बार्शी शाखा