Latest Marathi News

BREAKING NEWS

मातोश्रीची झोप उडालीय, आता सगळं बाहेर येणार’, नारायण राणेंचा दावा

0

दिशा सालियन हत्या प्रकरणी भाजप नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय. विशेष म्हणजे दिशा सालियन प्रकरणी राज्य सरकारने एसआयची चौकशी लावल्यामुळे ‘मातोश्री’ची झोप उडाल्याचा दावा नारायण राणे यांनी केला. “ठाकरेंनी अनेक भ्रष्टाचार पचवायचा प्रयत्न केला. आता सगळं बाहेर येणार. ग्रामपंचायत निवडणुकीत उडालेला धुव्वा, मोर्चाचा फज्जा आणि आता दिशा सालियन प्रकरणी एसआयटी लावल्यामुळे मातोश्रीची झोप उडाली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे”, असा दावा नारायण राणे यांनी केला.

आतापर्यंत ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीवर जे आरोप झाले त्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. ना उद्धव बोलत, ना आदित्य बोलत. काय बोलतोय पिल्लू? भडभड बाहेर येतो, मीडिया ऐकते म्हणून घणाघात, अरे काय त्याचा घणाघात? एक विषय माहिती नाही. कशाचा अर्थ कुणालाही लावतो. त्यामुळे आदित्य ठाकरे सुशांत आणि दिशा सालियनच्या केसमध्ये आरोपी आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केला”, असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला.

तो काय व्यवहार झाला मला माहिती आहे. दिशाच्या आई-वडिलांना कुठे बोलावण्यात आलं, कुठे ठेवण्यात आलं, हे मला माहिती नाही. हत्या झाल्यानंतर कुटुंबाने सांगितलं आमचा संबंध नाही तरीसुद्धा संपत का? हत्या म्हणजे हत्या. खून. कलम 302. हे आता नको ते मुद्दे नका काढू”, असं राणे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.