Latest Marathi News

BREAKING NEWS

मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणार

0

 

राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या 1 हजार 64 उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (गुरुवारी) झालेल्या बैठकीत सांगितलं. गुरुवारी रात्री आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर काल रात्री सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली.

मुख्यमंत्री शिंदे या बैठकीत बोलताना म्हणाले की, “साधारणपणे 2 हजार 185 उमेदवार मराठा आरक्षण घेऊन शासन सेवेत रुजू होणार आहेत. यापैकी 419 उमेदवार शासन सेवेत रुजू झाले आहेत, तर 1 हजार 064 उमेदवारांना विविध विभागांमध्ये तत्काळ रुजू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल. या नियुक्त्या करण्याबाबतचा अध्यादेश तातडीनं काढण्यात येईल.

तसेच उर्वरित 702 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी, तसेच विभाग यांच्यामार्फत विशेष मोहीम घेण्यात येईल. येत्या काळात स्थापन करण्यात येणारी उपसमिती मराठा आरक्षण संदर्भातील सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी या संस्थांना सक्षम करण्यास प्राधान्य देण्यात येईल.”, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य शासनाची बाजू अधिक सक्षमपणे मांडण्यासाठी अभ्यास करण्यात येईल.”, असंही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.