कोल्हापूर |
मराठा आरक्षणाची मागणी १९८५ पासून केली जात आहे. तेव्हापासून आजवर झालेल्या मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याची धमक दाखविली नाही. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची हिम्मत दाखविली. तीन मधल्या काळातील सरकारला कोर्टामध्ये टिकविता आले नाही.
त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नसून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देऊ असं प्रतिपादन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कागल मध्ये एका कार्यक्रमात बोलताना केले.