Latest Marathi News

BREAKING NEWS

नागपूर | लाखो बौद्ध अनुयायांच्या उपस्थिती 66 वा धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा

0

 

नागपूर | बुद्धाचे तत्वज्ञान विश्वकल्याणाचे आहे. बुद्धाने दिलेले पंचशीलाचे तत्त्व जगाच्या कल्याणाचं आहे. हाच समता आणि बंधुतेचा आधार आहे. हाच धम्म स्वीकारून बाबासाहेबांनी या देशातील जनतेला सामाजिक, आर्थिक दृष्टीने न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांच्या कार्याची तुलना जगातील अमेरिकेतली मार्टिन ल्यूथर किंगसोबतच होऊ शकते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पवित्र दीक्षाभूमीवर बुधवारी 66 व्या धम्मप्रवर्तन दिनाच्या मुख्य समारोहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, बाबासाहेबांनी सामाजिक बदल आणि शैक्षणिक विकास यावर भर दिला होता. यामुळे मोठे परिवर्तन झाले. ही दीक्षाभूमी या परिवर्तनाचा केंद्रबिंदू असून आम्हा सर्वांची प्रेरणाभूमी आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करण्याची आज खरी गरज आहे. तसेच दीक्षाभूमीला अतिरिक्त जागा देण्याचा विषय आम्ही केंद्रीय स्तरावर मांडून त्यावर लवकर निर्णय घेऊ.

यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात तथागतांचा बुद्ध धम्म देऊन या देशातील जनतेला प्राचीन संस्कृतीशी जोडले. बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध धम्म हा वैश्विक धम्म आहे. त्याचे अनुभव देशविदेशात भेटी दिल्यानंतर प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी फडणवीसांनी दीक्षाभूमीच्या विकासाचा 190 कोटींचा आराखडा येत्या 15 दिवसांत मंजूर करु असा शब्द दिला. दीक्षाभूमी सध्या ब वर्ग पर्यटन केंद्र असून ते अ वर्ग करावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.