मंत्रालयातील बोगस प्रकरण काही दिवसांपासून समोर ये असून मंत्र्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने काही समाजकंठक बेरोजगार तरुणाची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर येत आहे. अशातच आता पुन्हा एकदा मंत्रालयात शिपाई पदावर नोकरी लावतो म्हणून योगेश तवरे या तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता कोपरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
समोर आलेल्या महतीनुसार मुंबईच्या दादर भागात राहणारे विशाल गोणभरे आणि श्याम खतकर या दोघांनी आपसात संगनमत करून ठाण्यातील योगेश तवटे या सुरक्षा रक्षकाला मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत त्यांना बनावट कॉल लेटर, बनावट ओळखपत्र आणि शिपायाचा गणवेशही दिला. त्या बदल्यात त्यांच्याकडून १४ लाख ३१ हजारांची रक्कम धनादेशाद्वारे, गुगल पे आणि रोखीने स्वीकारली.
सदर प्रकार २३ नोव्हेंबर २०२२ ते २० फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये घडला. तवटे यांना नोकरीला न लावता, त्यांचे पैसेही त्यांना परत करण्यात आले नाहीत. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी त्यांनी ३ एप्रिल २०२३ रोजी कोपरी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड हे याप्रकरणी तपास करीत आहेत.