Latest Marathi News

BREAKING NEWS

50 खोके घेऊन चोर आले… शिंदे गटाविरोधात रॅप सोंग बनवणाऱ्यावर गुन्हा दाखल

0

एकनाथ शिंद एयानी बंडखोरी करून भारतीय जनता पक्षासोबत ४० आमदारांना बरोबर घेऊन सरकार स्थापण केले यानंतर विरोधक अर्थात उद्धव ठाकरे गट यांच्याकडून ५० खोके घेऊन आमदार विकले गेले असल्याचा आरोपच शिंदे गटावर करण्यात आला मात्र ५० खोक्यांचा आरोप अनेकदा शिंदे गटाच्या आमदारांच्या जिव्हाळी लागल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते. ५० खोकेच्या घोषणा अर्थसंकल्प अधिवेशनात सुद्धा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या होत्या. तसेच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा वेळोवेळी जाहीर सभेत ५० खोक्यांचा विषय काढून शिंदे गटाला डिवचले होते.

अशातच आता 50 खोके आणि चोर या शब्दांचा वापर करत एका रॅपरने शिंदे गटावर गाणं तयार केले. हे गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. शिंदे गटावर गाणं बनवणाऱ्या रॅपरविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज मुंगासे असे या रॅपरचे नाव आहे. मुंगासे विरोधात अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रॅपर राज मुंगासे याचे चोर आले, चोर आले, पन्नास खोके घेवून चोर आले अशा प्रकारचे गाणं सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या रॅपरच्या विरोधात शिंदे गटाकडून अंबरनाथ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटाच्या युवासेना कोअर कमिटी सदस्य स्नेहल कांबळे ह्यांनी रॅपर राज मुंगासे ह्याच्याविरोधात अंबरनाथ पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांकडून मुंगासे याच्या विरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅपरने सरकार विरुद्ध बदनामीकारक रॅप केले असल्याचा आरोप कांबळे यांनी तक्रारीत केला आहे. हा रॅपर छत्रपती संभाजीनगरचा आहे. याप्रकरणी मुंगासे याला अटक होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.