“डिग्री डिजिटल लॉकरमध्ये गेल्याने पदवी मिळवण्यासाठी लागणार विलंब टाळता येईल…!” – चंद्रकांतदादा पाटील
पुणे |
सर्वसाधारणपणे पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी वेळ लागत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतो. डिजिटल लॉकरमध्ये डिग्री अतिशय जलद गतीने मिळत असल्याने मधल्या काळातील विलंब टाळण्यास मदत होईल, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, डिग्री मिळायला वेळ लागतो. ३ ते ४ महिने जातात. त्यामुळे नव्याने पूर्ण महाराष्ट्रामधील युनिव्हर्सिटीना प्रत्येक विद्यार्थ्यांचं डिजिटल लॉकर ओपन करायला सांगितलं आहे. जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांचं ते झालं आहे. रिझल्ट लागल्यानंतर काही वेळातच हि डिग्री त्यांच्या डिजिटल लॉकरमध्ये सेव होईल. विद्यार्थ्यांना केव्हाही त्याची प्रिंट काढता येईल. तीन – चार महिने थांबण्याची गरज नसल्याचे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, अनेकांना प्रॉब्लेम होतो हे सर्टिफिकेट मिळण्यासाठी. आता प्रत्येकाची डिग्री जेव्हा डिजिटल लॉकरमध्ये जाईल तेव्हा कॉनव्होकेशन च्या कार्यक्रमाची गरज उरणार नाही. तरीही गोल्ड मेडल मिळवलेले , विशेष स्कॉलरशिप मिळवलेले, यांचा एक कार्यक्रम करावा लागेल. या कार्यक्रमामध्ये जे ब्रिटिश कालीन झगे घालून आपण चालतो आणि चौकोनी टोप्या त्याची काय आवश्यता नाही. आपण आपल्या भारतीय वेषामध्ये कार्यक्रम केले पाहिजेत. या आठवड्यात मी दोन ठिकाणी कॉनव्होकेशन च्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. दोन्ही ठिकाणी साधेपणाने कार्यक्रम झाला. महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना आता कॉनव्होकेशन पर्यंत डिग्रीसाठी थांबण्याची आवश्यकता नाही. हि एक मोठी सोय आपण दिली असल्याचे पाटील यांनी म्हटले.