जालना : मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यानी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु केले आहे. आज त्यांचा उपोषणचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. पाण्याचा गोठ देखील घेतला नसून,त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे. उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. आता त्यांना उठायला, बोलायलाही त्रास होत आहे. तरी अद्याप सरकारकडून आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही.
उपोषणाच्या भूमिकेवर ठाम….
गेल्या चार दिवसांपासून सरकारकडून त्यांच्या आंदोलनाची दखलही घेण्यात आलेली नाही. आता मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याने सरकारपुढे मोठे आव्हान उभे टाकले आहे. दरम्यान, सोमवारी रात्री आंतरवाली सराटीमध्ये जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल स्वतः जरांगे यांच्या भेटीला पोहोचले होते. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत जरांगे हे उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, तर मराठा समाज मुंबईला जाईल की अन्य कुठे हे मी आताच सांगू शकत नाही. हे आंदोलन आता केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, या प्रकरणी तब्बल 14 राज्य एकत्र येणार आहेत, असे ते म्हणालेत.
15 फेब्रुवारीला सरकारकडून स्वतंत्र आरक्षण देण्याची हालचाली मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर सरकारकडून स्वतंत्र आरक्षण देण्याची हालचाली मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल 15 फेब्रुवारीला सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर 17 किंवा 18 तारेखला विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाच्या कायद्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण यावेळी दिला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी मात्र ओबीसीमधूनच आरक्षणाची मागणी केली आहे. त्यासाठी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे करत आहेत.