Latest Marathi News

BREAKING NEWS

मालेगावातील सभेपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का! उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटात

0

मालेगावात उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे मालेगाव हा मंत्री दादा भुसे यांचा मतदार संघ असून आज सभेला उद्देशून उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना अदुसरीकडे शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे. मालेगावातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

एकीकडे आज उद्धव ठाकरे यांची थोड्यावेळात सभा पार पडणार असून दुसरीकडे शिंदे गटाने पुन्हा एकदा जोरदार दणका दिला आहे. राज्यात शिंदे शिंदे गटाचे सर्र्कर स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्य=कर्त्यांनी थेट शिंदे गटग प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज ठाणे येथे ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी 15 ते 20 महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिट्टी दिली आहे.

ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्यामागचं कारण विचारलं असता या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, “नाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना बोलण्याची पद्धत नाही.तिथे सभेत स्टेजवर महिलांच्या लाली-लिपस्टिकचा विषय काढला जातो. तुमचे हात वर असतील तर तंगड्या माझ्याकडे आहेत, अशा भाषेत कोणी बोलत असेल, कोणी आमच्या चारित्र्याला धक्का पोहोचवत असेल तर त्यांच्यासोबत काम करणं आम्हाला शक्य नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.