Latest Marathi News

BREAKING NEWS

अली जनाब हे उद्धव ठाकरे शोभा देते का? त्यांना ते भुषणावह वाटते का? हे त्यांनाच विचारा

0

ठाकरे गटाचे प्रमुख पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावामध्ये सभा होत आहे. या सभेआधी यांच्या पक्षाकडून ऊर्दु भाषेतील बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहे. यावरून शिंदे-फडणवीस सरकारने उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना दिसत आहेत. याच मुद्द्यावरून भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी उद्धव ठाकरेंना अली जनाब असे म्हणत टीका केली होती.

तसेच शिंदे गटाने सुद्धा यावर निशाणा साधला होता अशातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या त्या टीकेला शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले होते. फडणवीसांनी आम्हाला शिकवू नये, असे राऊत म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी ऊर्दु भाषेतील बनारबाजीवरून ठाकरे यांना अली जनाब म्हणत त्यांना याचे उत्तर बाळासाहेबांना द्यावेच लागणार असल्याचे म्हणाले.

ठाकरेंच्या मालेगाव मधील सभेच्या ऊर्दु बॅनर वरून देवेंद्र फडणवीस यांनी हा जोरदार निशाणा साधताना, अली जनाब हे उद्धव ठाकरे शोभा देते का? त्यांना ते भुषणावह वाटते का? हे त्यांनाच विचारा. पण त्यांना योग्य वाटतं असेल तर त्याला काही हरकत नाही. शेवटी ऊर्दु ही भाषा आहे. आमची काहीही हरकत नाही. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. आमचा फक्त लांगुलचालनाला विरोध आहे. आता जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन ते लांगुनचालन करत असतील तर त्यांना याचे उत्तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावे लागेल, असे फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.