१९९०च्या दशकाने माझ्या जीवनात सुख-दु:खाचे वैविध्यपूर्ण रंग भरले! जीवनाच्या त्या वळणावरील साथी,मित्र,धाकटा भाऊ संजू.. ज्येष्ठ पत्रकार,कवी, लेखक संजय जेवरीकर हा आज मुंबईत माझ्या घरी आला होता.प्रलयंकारी किल्लारी भूकंपापासून अगदी लोकनेते स्वर्गीय विलासरावजींच्या १९९५च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवांसारख्या मराठवाडा व लातूर जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक घटनांचे आम्ही प्रत्यक्षदर्शी! व्यक्तिगत जीवनातीलही अनेक सुख-दुखाचे मी व संजू वाटेकरी! त्यामुळे त्याच्या खूप दिवसांनंतरच्या भेटीने अनेक आठवणी ताज्या झाल्या.मी व सौ.मंदाने त्याला माझे”ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”हे पुस्तक भेट दिलं.
-राजा माने,
-संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ.
-संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.