Latest Marathi News

BREAKING NEWS

महिलांच्या अंर्तवस्त्रावरुन केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे अमिताभ बच्चन ट्रोल

0

मुंबई | अभिनेता अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. बिग बी नेहमीच वेगवेगळ्या विषयावर ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. अनेकदा बिग बींचे ट्वीट चर्चेचा विषय ठरतो. आतादेखील अमिताभ बच्चन अशाच एका ट्वीटमुळे चर्चेत आले आहेत. परंतु, यावेळी त्यांना ट्वीटमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

अमिताभ बच्चन यांचं जुनं ट्वीट व्हायरल होत आहे. २०१० साली बिग बी यांनी महिलांच्या अंर्तवस्त्राबाबत एक ट्वीट केलं होतं. “इंग्रजीमध्ये ब्रा एकवचनी आणि पॅन्टीज अनेकवचनी, असं का?” अशा आशयाचं ट्वीट अमिताभ बच्चन यांनी १२ जून २०१० रोजी केलं होतं.या जुन्या ट्वीटमुळे नेटकरी अमिताभ बच्चन यांना ट्रोल करत आहेत. एकाने “तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती”, असं म्हटलं आहे.

तर दुसऱ्याने “चांगला प्रश्न आहे…केबीसीच्या पुढच्या पर्वात विचारा,” अशी कमेंट केली आहे. “कोणीतरी महत्त्वाचा प्रश्न विचारला”, असं एकाने म्हटलं आहे. बिग बी लवकरच ‘कौन बनेगा करोडपती’चा पुढचा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याबरोबरच नाग अश्विन यांच्या ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटातही ते महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात बिग बींसह प्रभास, दीपिका पदुकोण आणि कमल हसन मुख्य भूमिकेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.