Latest Marathi News

BREAKING NEWS

महिला आमदारांना संजय राऊत वेश्या म्हणाले; शिंदे गटाच्या या आमदाराचा गंभीर आरोप

0

 

शिवसेनेतून बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन सरकार स्थापन केले आहे. त्यातच ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि आता शिंदे गटात महत्वाची भूमिका बजावणारे आमदार संदिपान भुमरे यांनी थेट खासदार संजय राऊतांवर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महिला आमदारांना वेश्या म्हंटलं असल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, संजय राऊत यांनी आमच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्या तोंडातून असे शब्द निघणे म्हणजे चांगलं नाही. त्यांनी फक्त माझ्या एकट्यावर टीका केली नाही तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांवर टीका केली. राऊत हे आम्हाला रेडे म्हणाले, कुत्रे म्हणाले, यांचे मृतदेह येतील असेही म्हणाले. एवढच नाही तर महिला आमदारांना वेश्या असल्याचं राऊत म्हणाले असल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे.

कॅबिनेट मंत्रीपद दिले असताना सुद्धा नाराजी का? या प्रश्नाला उत्तर देतांना भुमरे म्हणाले की, पक्षाने मला मोठ केले हे ठीक आहे. पण मी सुद्धा पक्षासाठी खूप काही केलं आहे. आम्ही काही थेट आमदार झालो नाही. पक्षवाढीसाठी सर्वांनीच काम केले आहे. गेली ३५ वर्षे पक्षासाठी मी काम केले असून, त्यासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत. त्यामुळे आम्हाला कुणीही काहीही शिकवाची गरज नाही असेही भुमरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.