Latest Marathi News

BREAKING NEWS

18 पैकी 12 खासदार, 20 माजी आमदार आमच्यासोबत येणार – गुलाबराव पाटील

0

 

शिवसेनेत बंड केल्यानंतर अनेक आमदार आपल्या घरी काल पहिल्यांदा पोहोचले आहे. महाराष्ट्रात जे काही मागच्या काही दिवसात चाललं आहे. ते महाराष्ट्रासह अवघ्या देशाने पाहिलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर हे राजकीय नाट्य संपुष्टात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक आमदार आता आपल्या मतदार संघात परतले आहेत.

अशातच काल रात्री उशिरा शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील जळगावात पोहोचले त्यानंतर त्यांचं तिथं स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आणखी काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर 18 पैकी १२ खासदार, २० माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

तसेच आम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं नाही, तर त्यांनी आम्हाला सोडलं असल्याचं देखील त्यांनी त्यांच्या समर्थकांना बोलून दाखवलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी अजूनही सावध रहावं असा सल्ला देखील त्यांनी ठाकरेंना दिला आहे आता या विधानावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.