Latest Marathi News

BREAKING NEWS

“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

0

 

सध्या राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे. अश्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही आणि ते उपमुख्यमंत्री होतील, हे आधीपासूनच ठरलं होतं का? याची चर्चा रंगली असताना त्यातच याबाबत आपल्याला आधीपासूनच माहिती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले आहे.

“मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाहीत. उलट याबाबत मला गर्व वाटत होता. त्यांनी दाखवून दिलं की पदापेक्षा ते महाराष्ट्राचं हित पाहतात. त्यांनी हसतमुखाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. याचा मला अभिमान आहे. कारण देवेंद्रजी नेहमी पदाच्या पलिकडे जात जनतेच्या हिताची कामं करतात”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात भाषण करताना रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांसोबत गाठीभेटी व्हायच्या. कुणी उठायच्या आत आम्ही आपापल्या घरी असायचो, असं सांगितलं. त्यांच्या या विधानाला अमृता फडणवीस यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे. “देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे. हुडी आणि गॉगल घातला की ते मलाही ओळखू यायचे नाही”, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.