लोकनेते दादासाहेब जाधवराव यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य नागरी सत्कार
पुणे |
लोकनेते दादासाहेब जाधवराव यांच्या वाढदिवसानिमित्त आज पुरंदर तालुक्यातील जनतेच्या वतीने दादासाहेबांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रकांत पाटील पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी दिनांक २९ जून रोजी जाधवराव यांच्या सत्कार समारंभात उपस्थित राहून दादासाहेबांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी ग्रामीण भागातील दादासाहेबांवर प्रेम करणारे सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन दादा जाधवराव गौरव समिती व दादा जाधवराव विचार मंच यांच्या वतीने करण्यात आले.