शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशातच जयंती साजरी करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. याच दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विनम्र अभिवादन केलं आहे,
“बाबासाहेबांशी नातं हे रक्तानं होत नाही, जो विचारांशी नातं सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल” असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आता या टीकेला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले की, जर असं होत मग आमच्या सोबत युती का केली? आमच्या सोबत सत्तेत होते तेव्हा त्यांना नाही ही गोष्ट आठवली, असा जोरदार टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
तसेच ते म्हणाले की, सकाळपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतो आहे. यामध्ये गद्दारांना तुडवा, साहेबांनी सुद्धा सांगितले की, गद्दारांना माफी नाही. आनंद दिघे यांच्या धर्मवीर चित्रपटात सुद्धा सांगितले की, गद्दारांना माफी करून देऊ नका. त्यामुळे या गद्दारांना माफी नाही.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा वाईट वाटत असेल. ज्या प्रकारे ज्या शिवसेनेला त्यांनी तयार केलं त्या शिवसेनेत अशा प्रकारची फूट पाडली. भाजपने या शिवसेनेत फूट पाडली आहे. पैसे देऊन ही फूट पाडली, असा आरोप खैरे यांनी केला.