कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न
कसबा पेठ विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच नाव निश्चित केले जाईल – चंद्रकांत पाटील
पुणे |
पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. या मतदारसंघात कोण उमेदवार असेल याबाबत आज पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, मी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आम्ही सगळेजण हे मानणारे आहोत कि, बाळासाहेबांचं महाराष्ट्रवर महाराष्ट्राच्या विकासावर , हिंदुत्वाच्या रक्षणात एक मोठं योगदान आहे. त्यांना अभिवादन करतो आणि या निवडणुकीची तयारी सुरु झाली असे घोषित करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. सध्या कमळ चिन्ह हाच उमेदवार मानून भाजप कामाला लागली आहे. कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी भाजपच्या तीन समित्या काम करतात. पुण्यातील निवडणुकीसाठी देखील समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कसाब निवडणुकीसाठी लवकरच नाव निश्चित केले जाईल. जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक चालेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आज पहिली बैठक झाली. उमेदवारांचा विचार झाला. भाजपच्या तीन समित्याद्वारे यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. राजकीय समितीत आमदार माधुरीताई मिसाळ प्रमुख असतील. संजयनाना काकडे, गिरीश गणेश बीडकर, धीरज घाटे, शैलेश टिळक हे एका समितीत असतील. शहराचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे करतील. तिसरी समिती हि निवडणूक संचालन समिती ज्याचे प्रमुख प्रमोद कोंडवे हे असतील.
पालिका निवडणुकीच्या तयारीबाबत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, पालिकांच्या निवडणुकीची आमचे ५ वर्ष सरकार असतानाही तयारी असायची. महानगरपालिका बरखास्त झाल्यापासून रोज तयारी सुरु आहे. एक न एक नगरसेवक एक प्रसंग सोडत नाहीय. प्रत्येक जण अलर्ट आहे. नगरसेवक असो किंवा नसो लोकांची सेवा करायचीच आहे, असे पाटील यांनी सांगितले.
आमचा पक्ष पूर्ण लोकशाही मार्गाने सुरु आहे. आता इच्छुकांची नावे प्रदेशला पाठवणार . त्यातील नावे शॉर्टलिस्ट केली जातील. आणि मग ती दिल्लीला जातात. आमची घोषणा सुद्धा गल्लीत होत नाही दिल्लीत होते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.