आ. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे होणारी कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकण्याचा निर्धार आज #पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. खा. गिरीश महाजन यांचं मार्गदर्शन आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात निवडणूक होईल. या पोटनिवडणुकीबाबत आज माझ्या कोथरूड निवासस्थानी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीला भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, कुणाल टिळक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना काकडे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. भीमराव तापकीर, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि सर्व पदाधिकारीही उपस्थित होते.
कसबा भाजपाचा परंपरागत मतदारसंघ आहे. येथील सर्व मतदार नेहमीच भाजपावर मनापासून प्रेम करतात. मुक्ताताई टिळक यांच्या निधनामुळ ही पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचं नाव पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डकडून येईलच. पण आम्ही पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केलीही आहे. मताधिक्य वाढण्यावर आमचा भर असेल.
मुक्ताताईंच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांचीच भावना आहे. मात्र, गाफिल न राहता विजयासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागलो आहोत. पोटनिवडणुकीतील विजयच मुक्ताताईंना श्रद्धांजली ठरेल असे उदगार यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काढले होते.