सातारा : आपल्या नृत्यापेक्षा विविध कारणांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेली गौतमी पाटील पुन्हा एकदा च चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी तिच्यावर भाष्य करत सल्ला दिला होता तसेच अनेकांनी तिच्या टीका सुद्धा केली होती तरी सुद्धा महाराष्ट्रात गौतमी पाटील हिची क्रेझ अधिकच वाढत होती अशातच आता सातारा येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची गौतमी पाटील हिने भेट घेतली.
गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी, त्यामुळे होणारे राडे आणि पोलिसांवर वाढणारा ताण पाहता अनेकांकडून तिच्या कार्यक्रमाला बंदी घालण्याची एकमताने मागणी होत आहे. तर दुसरीकडे बार्शीत तिच्या विरोधात फसवणुकीचा आरोप आयोजकांकडून करण्यात आलाय. या आरोपांप्रकरणी बार्शीत गौतमीच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय.
आता या सगळ्या घडामोडींदरम्यान आज गौतमीने अचानक उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. गौतमीने खासदार उदयनराजे यांच्या भेटीत राजेंना भेटवस्तू देखील दिल्याची माहिती समोर आलीय.
या भेटीनंतर बोलताना पाटील म्हणाले की, महाराज यांची भेट घेतल्यानंतर खूप छान वाटलं. महाराजांची आज भेट होईल, असं मला सकाळी खरं वाटलं नव्हतं. पण अखेर खरंच भेट झाली. महाराजांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांना भेटून खूप छान वाटलं अशी प्रतिक्रिया गौतमी पाटील हिने दिली आहे.