Latest Marathi News

BREAKING NEWS

‘लोकांना हे आवडलं नाही, राज्यात वेगळं चित्र पाहण्यास मिळेल, पवारांचे सूचक विधान

0

 

शिंदे गटाच्या अबडखोरीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले होते यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य करत शिंदे गटावर तोफ डागली आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आहे. पण खरे शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. राज्यात झालेले सत्ता परिवर्तन हे लोकांना आवडले नाही त्यामुळे आगामी काळात लवकरच एक वेगळे चित्र पाहण्यास मिळेल, असं भाकित शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये घेतली. यावेळी शरद पवार यांनी सर्व नेत्यांना काही महत्त्वाच्या सुचना केल्या. आज देशभरात ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नाही, अशा राज्यांमध्ये विरोधकांना पाडण्याचे काम सुरू आहे. सरकार बरखास्त करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण आज ना उद्या जनता हे सरकार बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पवारांनी मोदी सरकारला दिला. महाराष्ट्रामध्ये सत्ता गेली तरी फरक पडत नाही.

तसेच आजही निवडणुकांसाठी आमचे कार्यकर्ते तयार आहे. लोकांच्या अडचणीला धावून गेले पाहिजे. आज संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम भाजप करत आहे. मध्य प्रदेशमध्ये काय झाले आणि आता महाराष्ट्रात काय चाललं आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. लोकशाहीने आलेले सरकार हे बाजूला करण्यात आले आहे. आपल्या हातात सत्ता कशी राहिल, या बाजूने सगळे प्रयत्न सुरू आहे. ईडी आणि सीबीआयही कालपर्यंत कुणाला माहिती नव्हती. आता सत्तेचा वापर करून राजकीय सुडापोटी कारवाई केली जात आहे, अशी टीकाही पवारांनी केली.

आज शिवसेनेमध्ये जे घडत आहे, त्यामुळे शिवसैनिक कुठेही हलला नाही. ज्यांनी सत्ता मिळवण्यासाठी बंड केला आहे. त्यांच्याविरोधात सर्व शिवसैनिक एकवटले आहे. राज्यात जे काही सत्ता परिवर्तन झाले आहे. ते लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे राज्यात आगामी काळात वेगळे चित्र पाहण्यास मिळणार आहे, असं भाकितही शरद पवारांनी व्यक्त केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.