Latest Marathi News

BREAKING NEWS

५ वाजेपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेट अन्यथा मनोज जरांगे-पाटील घेणार मोठा निर्णय

0

बीड । मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच जालना येथे मराठा समाजावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. त्यानंतर राज्यात संतापाची लाट पसरली होती तर या लाठीहल्ल्यांनंतर सर्वपक्षीय नेते जालना येथे आंदोलनस्थळी जाऊन मुख्य आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणचा आज आठवा दिवस आहे. त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून त्या निर्णयावर ते अमल सुरु करतील. असं झाल्यास सरकारच्या अडचणी आणखी वाढू शकतात. आधीच उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाहीय. शुगर, बीपी डाऊन आहे. झोप लागत नाहीय. अशावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पाणी सोडल्यास त्यांची प्रकृती आणखी खालावेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यानंतरही मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. सरकारने अध्यादेश घेऊन यावं, नाहीतर आजपासून पाण्याचा त्याग करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गिरीश महाजन आज जालन्यातील आंदोलन स्थळी जाणार आहेत. सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारच शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहे.

तर या संदर्भात बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मी आंदोलनावर ठाम असून शांततेत आंदोलन सुरु ठेवणार. महाराष्ट्रतील मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सरकारच्या शब्दावर मी पाणी सुरु केलं होतं. पण आज सरकारी अध्यादेश आला नाही, तर पाच वाजल्यापासून पाण्याचा त्याग करणार. मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” असं त्यांनी सांगितलं.

दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाटला; ठाकरे गटाने साधला जोरदार निशाणा

Leave A Reply

Your email address will not be published.