Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रवादीच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी महेश चव्हाण, तर विधानसभा अध्यक्षपदी भारत देशमुख

0

सोलापूर |

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बार्शी दौरा निश्चित झाला असून २७ ऑक्टोबर रोजी ते बार्शीत येणार आहेत. माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांचा त्याचदिवशी राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश होणार असून तत्पूर्वी राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बार्शी तालुका अध्यक्षपदी बुधवारी महेश चव्हाण, वैराग विभाग अध्यक्षपदी शहाजी पाटील आणि बार्शी विधानसभा अध्यक्षपदी भारत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. विश्वास बारबोले यांच्या प्रमुख उपस्थितीतच ह्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्याहस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी बार्शी तालुक्याचे नेते विश्वास बारबोले, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, इकबाल पटेल, विक्रम सावळे, विनोद नाना वाणी, किरण देशमुख, विक्रमसिंह पवार, उमेश नेवाळे, भास्कर बगाडे, बाळासाहेब पवार, जॉन चोप्रा, रोहित अवघडे, शिरीष ताटे, इब्राहिम शेख, ऋशिकांत पाटील, अच्युत पवार, जयंत देशमुख, हर्षवर्धन बोधले, संदीप बोटे, भाऊ वैद्य,रत्नदीप कुलकर्णी, व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात मनसेच्या विक्रमसिंह पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तसेच, प्राध्यापक किरण देशमुख यांनीही घड्याळ हाती बांधलं. देशमुख यांना बार्शीच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तर, विक्रमसिंह पवार यांना शहर कार्याध्यक्ष करण्यात आले. विक्रमसिंह पवार हे माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांचे निकटवर्तीय आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.