अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधातील कारवाई आणखी तीव्र झाली आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या ‘डी’ कंपनीच्या टोळीतील संबंधांची माहिती देणाऱ्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रोख बक्षीस जाहीर केले आहे. दाऊद इब्राहिमवर NIA ने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. छोटा शकीलवर 20 लाख रुपये तसेय अनिस, चिकना आणि मेननवर प्रत्येकी १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
दाऊद इब्राहिमने भारतात शस्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनी नोटांची (एफआयसीएन) तस्करी करण्यासाठी एक युनिट तयार केले आहे. आणि पाकिस्तानी एजन्सी आणि दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने दहशतवादी हल्ले घडवण्याची योजनाही आखली आहे तसेच देशात होणाऱ्या बॉम्बब्लास्ट मध्ये सुद्धा त्याचा सहभाग आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, एजन्सीने दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम उर्फ हाजी अनीस, जवळचे नातेवाईक जावेद पटेल उर्फ जावेद चिकना, शकील शेख उर्फ छोटा शकील आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ टायगर मेमन यांना बक्षीस जाहीर केले आहे. दाऊदवर २५ लाख रुपये, छोटा शकीलवर २० लाख रुपये, अनीस, चिकना आणि मेमनवर १५ लाख रुपये जाहीर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.