Latest Marathi News

BREAKING NEWS

क्रांती रेडेकर- समीर वानखेडे यांनी पहिल्यांदाच घेतले एकत्र साईबाबाचे दर्शन

0

अहमदनगर |

आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच मागितल्याच्या आरोपा प्रकरणी चर्चेत आलेल्या एनसीबीचे मुंबई क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी रविवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर समीर वानखेडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

चिखल साफ करत असताना काही शिंतोडे तुमच्या उडणार हे लक्षात ठेवले पाहिजे. आरोप-प्रत्यारोप होणे हा आपल्या कामाचा भाग असतो. तो आपण सकारात्मक पद्धतीने घेतला पाहिजे. आमची भावना फक्त राष्ट्राकडे आहे. जर चूक झाली असेल तर आपण ती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

साई दर्शानाला आल्यानंतर पत्रकारांनी त्यांनी तुम्ही साई बाबांकडे या मागणी केली असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले. मी साई भक्त असल्याने नेहमीच साईच्या दर्शनासाठी येत असतो. आपण आज साईबाबांकडे विजयी भव हा आशिर्वाद मागितला असल्याचे म्हटले. समीर वानखेडे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर ह्याही होत्या. साई दर्शनाच्या औचित्यबद्दल बोलताना त्यांनी आमच्यावरचे सगळे विघ्न दूर व्हावेत आणि न्याय व्हावा यासाठी आज साईबाबांच्या चरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या २२ वर्षापासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आम्ही येतोय. सत्य आमच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन क्रांती रेडकर यांनी बोलताना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.