Latest Marathi News

BREAKING NEWS

“सगळे विरोधक जरी एकत्र आले तरी नरेंद्र मोदींना कोणीही अडवू शकत नाही…! – चंद्रकांतदादा पाटील

0

सातारा |

भारतातले सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणीही अडवू शकत नाहीत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी नावाच्या वज्रमूठ आघाडीला तडे गेले आहेत. सर्वजण आपले पक्ष कसे वाचतील याची चिंता करत आहेत. यामुळे देशातील राज्यातील निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सातारा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर सभा झाली. मोदीजींच्या नेतृत्वात देशाने केलेल्या प्रगतीबाबत विचार मांडले‌. मोदीजींच्या नेतृत्वावर अमेरिका सारख्या देशाने आपला दृढ विश्वास व्यक्त केला आहे. नुकत्याच माननीय मोदीजींच्या अमेरिका दौऱ्यात आपणा सर्वांना याची प्रचिती आली. मोदींनी देशाच्या चौफेर विकास केला. कोविड काळात मोफत लसीकरण केले. सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा केले. परदेशामध्ये देशाला सन्मान मिळवून दिला. यामुळे मोदी विरोधक हतबल झाले आहेत, असे प्रतिपादन ही चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.

यावेळी विधान परिषदेतील नेते प्रवीण दरेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे ,अतुल भोसले, नरेंद्र पाटील, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, विठ्ठल बलशेठवार, विकास गोसावी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.