Latest Marathi News

BREAKING NEWS

सोबत मुलगा, जावई अन् अख्ख मंत्रिमंडळ, केसीआर सोलापुरात करणार ग्रँड एण्ट्री!

0

सोलापूर |

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह आज सोलापुरात, उद्या पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेऊन बीआरएस पक्ष करणार शक्ती प्रदर्शन, सोलापुरात आज तीनशे गाड्यांचा ताफा दाखल होणार, हेलिकॅप्टर च्या माध्यमातून विठ्ठल मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली.

बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात पक्ष विस्तारीकरण करायचे आहे. नांदेड छत्रपती संभाजी नगर यानंतर बीआरएस पक्षाने सोलापूर जिल्ह्यावर केंद्रित केले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे हे दोन दिवसीय सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. २६ जून रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्यामध्ये बदल झाला असून हेलिकॉप्टर ऐवजी बाय कारने ते सोलापुरात येणार आहेत. त्यांच्यासोबत चिरंजीव केटीआर, जावई तथा तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव हे असणार आहेत. केसीआर यांच्यासोबत तीनशे गाड्यांचा ताफा असणार आहे.

गेल्या दोन महिन्यापासून बीआरएस पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांना ऑफर देण्यात आले आहेत.. गेल्या पंधरा दिवसापासून पंढरपूर विधानसभेतील मातब्बर नेते भगीरथ भालके यांनी केसीआर यांची हैदराबाद येथे जाऊन भेट घेतली होती. बीआरएस पक्षाकडून आषाढी वारीचा मुहूर्त साधून पक्षाच्या विस्तारीकरणासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन पंढरपुरात करणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळासह पांडुरंगाचे दर्शन घेणार आहे. विठ्ठलाच्या मंदिरावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी बीआरएस पक्षाचे लक्ष असणार आहे. त्याचवेळी सरकोली येथे बीआरएस पक्षाचा शेतकरी मेळावा होणार आहे या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे प्रवेश करणार आहेत. त्यासाठी बीआरएस पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.  के सीआर यांच्याकडून सोलापूर ऐवजी पंढरपूर तालुका हे सेंटर केले आहे. आषाढी वारीच्या दर्शनाच्या निमित्ताने पंढरपुरात येऊन के सी आर मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहे त्यांच्या नियोजनाची लगबग सध्या सोलापुरातील एका फाईव स्टार आणि थ्री स्टार हॉटेलमध्ये सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.