Latest Marathi News

BREAKING NEWS

कोथरुड हे माझं घर असून मला घरात ज्या सोईसुविधा मिळतात त्या मतदारसंघातील सर्वांना मिळाल्या पाहिजेत – चंद्रकांत पाटील

0

पुणे , १५ ऑक्टोबर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघाला भेट दिली. कोथरूडमधील शास्त्रीनगर मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पाटील यांनी पुढाकार घेतला.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, कोथरुड हे माझं घर असून मला घरात ज्या सोईसुविधा मिळतात त्या मतदारसंघातील सर्वांना मिळाल्या पाहिजेत, असा माझा नेहमीच आग्रह असतो. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील शास्त्रीनगर भागात ड्रेनेज लाईनची समस्या बिकट झाली होती. ड्रेनेज लाईनच्या समस्येमुळे इथले नागरिक हैराण झाले होते. याची माहिती मिळताच तात्काळ लोकसहभागातून २५ लाख रुपये खर्च करून भागातील ड्रेनेज लाईन बदलून दिली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले कि, याद्वारे शास्त्रीनगरमधील नागरिकांची समस्या सोडविण्याचे समाधान मिळाले‌. भविष्यातही जनसेवेसाठी तत्पर असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.