Latest Marathi News

BREAKING NEWS

कोल्हापूर : जिल्हा परिषद सभेत गोंधळ , सोशल डिस्टन्सचा फज्जा

0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हापरिषदेची आज, मंगळवारी सर्वसाधारण सभा झाली. ही सभा कोरोनामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार होती. व्हीसीवरून ऐकू येत नसल्यामुळे विरोधी आघडीचे सदस्य समिती सभागृहात घुसले.  विरोधी पक्ष भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सभागृहात प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी भाजपच्या सदस्यांना सोशल डिस्टन्सचे पालन केले का अशी विचारणा केली?  यावर काहीही न बोलता जी बैठक ऑनलाईन होणार होती ती बैठक ऑफलाईन घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य राहूल आवाडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

हे ही वाचा

व्हिडीओ: भरसभेत जि.प. अध्यक्षांनी काढला विरोधी सदस्याचा ‘बाप’

Leave A Reply

Your email address will not be published.