Latest Marathi News

BREAKING NEWS

व्हिडीओ: भरसभेत जि.प. अध्यक्षांनी काढला विरोधी सदस्याचा ‘बाप’

0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी तुमच्या पप्पांना विचारा माहिती आहे, असा शब्द प्रयोग विरोधी सदस्य राहुल आवाडे यांना त्याचे वडील आमदार प्रकाश आवाडे यांना उद्देशून टोमणा अध्यक्षांनी मारला. या प्रकारामुळे आवाडे यांच्यासह विरोधकांनी पाटील यांच्यावर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी रंगली.

यापूर्वीच ही सभा सभागृहात घ्यायची की समाज माध्यमाद्वारे यावरून सत्तारूढ व विरोधकात वाद रंगला होता. अखेर निवडक सदस्य सभागृहात आणि पत्रकार यांच्या सहभागाने सभा घेण्याचे ठरले.

सुरूवातीला सदस्य सभेचा व्हिडिओ आणि आवाज खराब येत असल्याने संतप्त झाले होते. ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेने परत पाठवल्याने त्याविषयी भाजपा समर्थक आवाडे यांनी विचारणा केली असता त्यावर अध्यक्ष पाटील यांनी ‘तुझ्या पप्पाला या निर्णयाबाबत विचार’, असे उत्तर दिल्याने वादाला तोंड फुटले.

आमदार आवाडे यांना उद्देशून टोमणा मारल्याने राहुल आवाडे यांच्यासह विरोधकांनी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला. अखेर पाटील यांनी उच्चारलेले शब्द कामकाजातून काढून टाकण्याचे त्यांनी मान्य केल्यावर वादावर पडदा पडला. घडल्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून जोरदार चर्चा रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.