Latest Marathi News

BREAKING NEWS

किशोरवयीन मुलांना गावात मोबाईल फोन बंदी; बान्सी गावाचा ग्रामसभेत ठराव

0

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल फोन आले. मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी बरेचदा वाईट परिणाम दिसून आले. किशोरवयीन मुलामुलींना व्यसन जडले. स्मार्टफोनचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊन अनेक मुलांना गेम्स, वाईट साईट पाहण्याचे व्यसन लागलेले असून हे दुष्परिणाम बान्सी गावातील नागरिकांना अनुभवास आले.

याच पार्श्वभूमीवर यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बान्सी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत किशोरवयीन मुलांना मोबाईल फोन बंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बान्सी हा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. पुसद तालुक्यातील साग जंगलाला लागून असलेल्या बान्सी गावात 11 नोव्हेंबर रोजी ही ग्रामसभा पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला.

पंचायत राजमुळे लोकशाहीत ग्रामपंचायतला मोठे अधिकार प्राप्त झाले आहेत. ग्रामविकास योजना राबवताना ग्रामसभेतील ठरावांना महत्त्व आले आहे. ग्राम विकासासोबतच समाज स्वास्थ्य तंदुरुस्त राहण्यासाठी काही ग्रामपंचायती ग्रामसभेत आगळेवेगळे ठराव घेत अंमलबजावणी करतात. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बान्सी ग्रामसभेने असाच एक वेगळा प्रयोग केला आहे.

किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईल फोनच्या आहारी गेली आहे. त्याचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी बांशी ग्रामसभेत अठरा वर्षाखालील मुला-मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातली आहे. बान्सी ग्रामपंचायतने घेतलेल्या या निर्णयाचे आता सर्वत्र कौतुक होतं दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.