मुंबईची मुलगी श्रद्धा हीची तिचा प्रियकर आफताब याने दिल्लीत हत्या केली, आफताब याने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले. हा विषय सध्या चर्चेत आहे. ही घटना देखील थरकाप उडवणारी आहे. आधुनिक जगात मुलींनी आणखी कितीतरी सावध राहण्याची गरज आहे. ही घटना आजच्या पिढीला तुमच्यासोबत किती वाईट घडू शकतं, यासाठी किती सावध राहण्याची गरज आहे हे, यात दिसून येतं.
यावर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हीने सनातन मुलांना सल्ले दिले आहेत. तिने एक पोस्ट केली होती, त्यावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यावर तिने पुन्हा उत्तर दिले आहे. केतकी चितळे या अभिनेत्रीला यापूर्वी अशाच एक वादग्रस्त पोस्टमुळे तुरुंगात जाण्याची वेळ आली होती, पण केतकी मात्र अजूनही आपल्या दिलखुलास, पण इतरांवर भेदक मारा करणाऱ्या पोस्ट करणे अजुनही टाळताना दिसत नाही.

केतकी चितळे हीने खालील पोस्ट केलीय
‘मेरा अब्दुल ऐसा नहीं बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना?
कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा तर विचार केल्यास अंगावर काटा येतोय.
मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात?’