किरण माने हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अनेक गाजलेले चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून ते कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहिले. परंतु, गेल्या काही काळापासून ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत आहेत. किरण माने सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असून अलिकडेच त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो पाहून सध्या चाहते कमालीचे अवाक् झाले आहेत.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या किरण माने यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते कमालीचे हँडसम दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा हा लूक चाहत्यांना चांगलाच आवडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या या फोटोवर नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत.
किरण माने यांनी मुलगी झाली हो या कार्यक्रमात विलास पाटलाची भूमिका साकारली होती या कार्यक्रमातून त्यांना कोणतीही सूचना न देता काढून टाकल्यामुळे त्यांनी थेट मीडिया हाऊस विरोधात लढा उभारला होता तसेच त्यांच्या या लढ्याला अनेक सामान्य जनतेने तसेच चित्रपट क्षेत्राशी संबंधित लोकांनी पाठिंबा दिला होता.