Latest Marathi News

BREAKING NEWS

सोलापुरात पिसाळलेले व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा ! अन्यथा महास्वराज भूमी पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार

0

सोलापूर |

शहरातील शास्त्रीनगर परिसरात २१ एप्रिल रोजी मोकाट व पिसाळलेले कुत्र्यांनी एका घरात पाच लोकांना चावा घेतला होता त्यामध्ये नऊ वर्षीय रोहन नावाचं मुलगा त्याला पण कुत्र्याने चावा घेतला होता त्याचा सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान १४ मे रोजी निधन झाला.

शास्त्रीनगर परिसरासह सोलापुरात अनेक ठिकाणी मोकाट व पिसाळलेले कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मोकाट व पिसाळलेले कुत्र्यांचा निर्भीजीकरण करून कुत्र्यांची वाढती जनगणना कमी व्हावी म्हणून राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीच्या वतीने सोलापूर महापालिकाचे आयुक्त यांना निवेदन द्वारे मागणी करण्यात आली.

त्यावेळी राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीचे महाराष्ट्र संघटक इन्चार्ज सादिक शेख, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वाहतूक आघाडी व सोलापूर जिल्हा संघटक महबूब कादरी, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्ष शाहनवाज पिरजादे, वाहतूक आघाडी जिल्हा संघटक अन्वर शेख, श्रीकांत कोळी, आरिफ शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.