Latest Marathi News

BREAKING NEWS

सोलापूर | केसीआर यांच्या जेवणासाठी खास बोकडाची मेजवानी

0

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून केसीआर महाराष्ट्रात आपलं वलय निर्माण करत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केसीआर हे आजपासून दोन दिवसीय सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचं आज सोलापूरमध्ये आगमन होणार आहे. तर उद्या ते पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत.

केसीआर आपल्यासोबत तीनशे गाड्यांच्या ताफ्यासह आपलं अख्ख मंत्रिमंडळ घेऊन पंढरपूरला येणार आहेत. मात्र महाराष्ट्रात येण्यापूर्वीच त्यांचा हा दौरा चर्चेत आला आहे. सोलापूरला येण्यापूर्वीच केसीआर आणि त्यांच्या मंत्रिमंडळासाठी धाराशिवमध्ये बोकडाच्या मटणाची मेजवानी ठेवण्यात आली आहे.

धाराशिवमधील मुरूम येथे के. चंद्रशेखरराव आणि त्यांच्या मंत्रिमंडाळासह दीड हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना इथे खास उस्मानाबादी बोकडाचे मटण आणि चिकनची मेजवाणी दिली जाणार आहे. त्यानंतर ते सोलापूरच्या दिशेनं रवाना होणार आहेत.मात्र या प्रकारामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज आपल्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह सोलापुरात येणार आहेत. ते उद्या पंढरपूरला जाऊन विठ्ठालाचं दर्शन घेणार आहेत.या निमित्तानं बीआरएस पक्ष महाराष्ट्रात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. के. चंद्रशेखर राव हे आज तीनशे गाड्यांच्या ताफ्यासह सोलापूरला येणार आहेत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून विठ्ठल मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.