Latest Marathi News

BREAKING NEWS

कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण वाट लावण्याचा तर हा डाव नाही ना?” रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा

0

मुंबई | केंद्राने अग्निपथ योजनेच्या माध्यमातून अग्नीवर नावाने कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला देशभरातून विरोध करण्यात आला होता. मात्र, सरकारने ही भरती प्रक्रिया सुरू केली असून आता पहिली तुकडी सैन्य दलात दाखलही झाली आहे. आता,शिंदे फडणवीस सरकारने पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलासाठी ही भरती काढण्यात आली असून पोलीस अंमलदार ते सहायक उपनिरीक्षक या पदासाठी ही भरती होत आहे.

महाराष्ट्र सरकारच्या पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादीने निशाणा साधला आहे. “राजकारणात पक्ष आणि नेते फोडाफोडीची नवीन प्रथा सुरू करुन महाराष्ट्राचं शालीन राजकारण भाजपाने मलीन केलं” असं म्हणत भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “आधीच बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण वाट लावण्याचा तर हा डाव नाही ना?” असा संतप्त सवाल देखील रोहित पवार यांनी विचारला आहे.

“राजकारणात पक्ष आणि नेते फोडाफोडीची नवीन प्रथा सुरु करुन महाराष्ट्राचं शालीन राजकारण भाजपाने मलीन केलं, त्याप्रमाणेच #कंत्राटीपोलिसभरती करुन आधीच बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण वाट लावण्याचा तर हा डाव नाही ना? अशी शंका येते. लाखो युवा #पोलिस #भरतीसाठी प्रयत्न करत असताना त्याकडं दुर्लक्ष करुन कंत्राटी भरती करणाऱ्या राज्य शासनाचा तीव्र #निषेध!” असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.