Latest Marathi News

BREAKING NEWS

लसीकरण मोहीम संपताच ‘सीएए’ होणार लागू – अमित शाह

0

 

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहीम संपताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा CAA लागू करणार असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी आज संसदेत अमित शाह यांची भेट घेतली.त्या भेटीवेळी शाह यांनी सीएए लागू करण्याचे आश्वासन दिले अशी माहिती सुवेंदु अधिकारी यांनी दिली.

पश्चिम बंगालमधील भाजपाकडून होत असलेले काम तसेच तेथील समस्यांबाबत सुवेंदु अधिकारी यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील 100 भ्रष्टाचारी नेत्यांची यादी शाह यांच्याकडे सोपवली असल्याचेही अधिकारी यांनी सांगितले. यावेळी दोघांमध्ये सीएए कायद्यासंदर्भातही चर्चा झाली. पश्चिम बंगालमधील बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दाही चर्चेत होता.

सीएए कायदा 11 डिसेंबर 2019 रोजी संसदेत संमत झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. विरोधी पक्षांनी सीएए कायद्याला जोरदार विरोध केला होता. परिणामी या कायद्यासाठी लागणारी नियमावली पेंद्र सरकारने अद्याप तयार केलेली नाही. मात्र कोरोना लसीकरण संपताच सीएए हे मोदी सरकारचे पुढचे लक्ष्य असेल असे सांगितले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत या कायद्याची अंमलबजावणी करणारच असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.