Latest Marathi News

BREAKING NEWS

कसबा, चिंचवड दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होणार

0

कसबा आणि चिंचवड पोट निवडणूकसितही भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडदीमध्ये जोरदार टक्कर होणार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा या दोन्ही निवडणुकीसाठी आपला पाठिंबा भाजपाला दर्शवला आहे त्यामुळे या दोन्ही निवडणुकीमध्ये कोणाच्या अंगाला गुलाल लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत स्याना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे या दोन्ही निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव होईल असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

विधानपरिषद निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले. त्यात एखादी जागा वगळता ती निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली आहे. हजारो मतदार, शिक्षक, पदवीधर अनेकांचा कल आणि कौल स्पष्ट आहे. त्यात लाख लाख मतदारांनी भाजपला नाकारले आहे. सर्व्हे येत असतात, ते दोन ते तीन हजार लोकांचे सॅम्पल घेतात. येथे तर प्रचंड संख्येने मतदार भाजपच्या विरोधात गेले आहेत, असे राऊत म्हणाले .

राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आज झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबतही राऊत यांनी भाष्य केले. आज झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत ते म्हणाले, सुनावणी आज झाली. उद्या पुन्हा होणार आहे. त्यात काय होतय ते पाहू. ते म्हणाले, आज एक मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की, काही झालं तरी निकाल आपल्या बाजूने लागणार आहे.

तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील एक ब्रेकिंग न्यूज देण्याचा प्रयत्न केला होता की, लिहून घ्या धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळणार आहे. इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील नाशिकमध्ये म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूनेच लागणार आहे. याचा अर्थ असा की न्यायपालिका माझ्या खिशात आणि आम्ही न्याय विकत घेऊ शकतो, असा तर नाही ना? मात्र आम्ही याबाबत असे काहीही बोलणार नाही. आम्ही एव्हढेच सांगू की, न्यायपालिकेवर आमचा विश्वास आहे, असेही राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.