Latest Marathi News

BREAKING NEWS

‘काही लोकांना वाटतं की माझं देशावर प्रेम नाही, पण…’, टीकाकरांना अमीर खान यांचे सडेतोड प्रतिउत्तर

0

अभिनेता आमिर खान याचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादामध्ये सापडला आहे. सोशल मीडियावर हा चित्रपट बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरू आहे. चित्रपटाबाबत नकारात्मक वातावरण निर्माण झाल्यामुळे आमिर खान व्यथित झाला आहे. आमिर खान याने आपल्या भावना मनमोकळ्यापणाने व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर आमिर खान याच्या जुन्या वक्तव्याच्या आणि त्याच्या चित्रपटामध्ये हिंदू धर्म, संस्कृतीबाबत दाखवलेल्या गोष्टींचा उल्लेख करत #BoycottLaalSinghChaddha हा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. यावर आता आमिर खान याने मौन सोडले आहे.

एक चित्रपट बनवण्यासाठी खुप मेहनत लागते. फक्त कलाकारच नाही तर अनेकांच्या भावना यासोबत जोडलेल्या असतात. चित्रपट पाहिल्यानंतर आवडणे किंवा न आवडणे हा प्रेक्षकांचा चॉईस असू शकतो.चित्रपट प्रदर्शनापूर्वी अशा गोष्टी तुम्हाला व्यथित करतात. लोक असे का करताहेत माहिती नाही.

तसेच काही लोकांना वाटते या देशाबाबत माझ्या मनात प्रेम नाहीय. त्या लोकांना मी सांगू इच्छितो की तसे नाहीय. माझ्या मनात या देशाबाबत आणि येथील लोकांबाबत खुप प्रेम आहे. त्यामुळे माझा चित्रपट बॉयकॉट करू नका आणि चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा, असे आवाहन आमिरने प्रेक्षकांना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.