Latest Marathi News

BREAKING NEWS

जे देशाला कळले,ते माझे पप्पा सोलापूरकरांना का कळले नाहीत? आ.प्रणिती शिंदे यांची खंत.

0

 

सोलापूर,दि.- “मी जेव्हा जेव्हा बाहेर फिरणे, तेव्हा अनेक वेळा माझ्या वडिलांबद्दलचा आदर मला अनुभवायला मिळतो,पण घरच्या माणसांची आपल्याला महत्त्व नसते,पण मला नेहमी वाटते,माझे पप्पा जे देशातील लोकांना कळले,ते सोलापूरकरांना का कळले नाहीत?”,अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आ.प्रणिती शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.

आपले वडिल,त्यांची वाटचाल आणि कौटुंबिक संस्कार या विषयी त्या भावूक झाल्या.२०१४ आणि २०१९ घ्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या झालेल्या पराभवाचा संदर्भ त्यांच्या भाषणात होता. राजकारणात बदललेल्या राजकीय संस्कृती बद्दलही प्रणिती यांनी दुःख आणि चिंता व्यक्त केली.

ज्येष्ठ पत्रकार , विचारवंत आणि संपादक अरुण खोरे आणि ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड यांच्या सुशीलकुमार शिंदे यांच्यावरील “ग्रंथप्रेमी,सुजन नये सुशीलकुमारजी शिंदे”या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात आ.प्रणिती शिंदे बोलत होत्या.प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व विचारवंत उल्हास पवार होते.प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती शरदकृष्ण ठाकरे,राम रेड्डी हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.