Latest Marathi News

BREAKING NEWS

बंडखोरांना परत आणण्यासाठी रश्मी ठाकरे यांची भावनिक साद”तुम्ही परिवाराचा भाग परत या”

0

 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत जोवर गेलेले बान्धखोर आमदार परत येत नाही तोवर महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात आहे अश्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सध्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी या बंडखोर आमदारांना फोन केलाय. यांच्याकडून आमदारांच्या पत्नींना फोन केला आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या पत्नींना फोन करुन रश्मी ठाकरे यांच्याकडून भावनिक साद घातली आहे.

आपण राजकीय पक्ष म्हणून नाही तर आजवर परिवार म्हणून एकत्र होतो, इथून पुढेही राहू, असं रश्मी ठाकरे यांनी म्हटलं आहे. सध्या मविआ सरकार वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आमदार फुटणं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हणणारे शरद पवारदेखील आता सरकार वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. शिवाय रश्मी ठाकरे यांनीदेखील अॅक्टिव्ह झाल्या आहेत. त्यांनी एक आवाहन केलं आहे.

सध्या मविआ सरकार धोक्यात आहे. अश्यात रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेत बंडखोरांच्या पत्नींना भावनिक आवाहन करत परत या, असं सांगितलं आहे. त्यांनी या बंडखोर आमदारांना फोन केलाय. यांच्याकडून आमदारांच्या पत्नींना फोन केला आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या पत्नींना फोन करुन रश्मी ठाकरे यांच्याकडून भावनिक साद घातली आहे. आपण राजकीय पक्ष म्हणून नाही तर आजवर परिवार म्हणून एकत्र होतो, इथून पुढेही राहू, असं रश्मी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.