शिवसेनेतील बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे एकनाथ शिंदे यांनाच विचारावे लागेल, राज्यात ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्या टीव्हीवरच दिसतात, आपला त्याच्याशी संबंध नाही शरद पवार , संजय राऊत यांना जरा जास्तच अभिव्यक्तिस्वातंत्र्य असल्याने ते सतत बोलत असतात. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
पाटील पुढे म्हणाले कि, राऊत तर सकाळी एक तर दुपारी दुसरेच बोलतात, शिंदे यांच्यासोबत कोण गेलेत, कोण जाणार आहेत, कोण परत येणार आहेत याबाबत आपल्याला काहीही माहित नाही. राज्यात सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
शिंदे यांच्यासोबत मोहित कांबोज असतील तर ते एकनाथ शिंदे यांचे मित्र असल्याने सोबत असतील. कांबोज हे सर्व पक्षातील नेत्यांचे मित्र आहेत त्यामुळे कदाचित ते सर्वत्र दिसतात. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला नाही, प्रस्ताव आला तर पक्षाची 13 जणांची कार्यकारणी आहे, त्यापुढे चर्चा करून तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल. मी सध्या कोल्हापुरात आलो आहे, माझे रुटीन कार्यक्रम सुरू आहेत ,काही राजकीय हा हालचाली भाजपकडून सुरू असते तर मला कोल्हापुरात येऊ दिले असते का ? असा सवाल सुद्धा त्यांनी विचारला आहे.