‘जशी एका प्रेयसीची आठवण असते, भेट तुझी आणि माझी, अजून त्या दिवसाची, धुंद वाऱ्याची, रात्र पावसाची, तशी हे 40 खोकेवाल्यांना गुवाहाटीला घेऊन जाणार आहे. बाबा रे काय ती झाडी काय, तो डोंगर, काय ते हॉटेल, या परत या आपण आपल्या आठवणी जाग्या करूया, म्हणून एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला चालले आहे’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सणसणीत टोला लगावला.
एकनाथ खडसे मुक्ताईनगरच्या अंतुरली गावात जनसंवाद यात्रेसाठी आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर कवितेतून टीकास्त्र सोडले. आमदारांना दाखवून देणार आहे, आठवण करून देणार आहे. जशी एका प्रेयसीची आठवण असते, भेट तुझी आणि माझी, अजून त्या दिवसाची, धुंद वाऱ्याची, रात्र पावसाची, तशी हे 40 खोकेवाल्यांना गुवाहाटीला घेऊन जाणार आहे. बाबा रे काय ती झाडी काय, तो डोंगर, काय ते हॉटेल, या परत या आपण आपल्या आठवणी जाग्या करूया, म्हणून एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला चालले आहे’ असा खुमासदार टोला खडसेंनी शिंदेंना लगावला.
तसंच, ‘तुम्हाला गुवाहाटीला जायचं असेल तर नक्की जा, विमानाने जा. पण गोरगरिबांना 2 रुपये किलोनं धान्य तर द्या.. तुम्हाला काय करायचे ते करा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तरी थांबवा. तरुण शेतकरी आत्महत्या करत आहे. सदन शेतकरी आत्महत्या करत आहे. जळगाव जिल्ह्यात 3 महिन्यात सर्वात जास्त संख्या आहे. जळगाव जिल्हा हा केळी बागायतदारांचा आहे, कापसावाला आहे, हे दुर्दैवी आहे’ अशी टीकाही खडसेंनी केली.