Latest Marathi News

BREAKING NEWS

इरफान खान यांच्या नावावरून या मराठी अभिनेत्यानं ठेवलं मुलीचं नावं !

0

दिवंगत अभिनेता इरफान खान हे नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या मनात राहिल. इरफान खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये काही ठरावीक चित्रपट केले पण त्यांनी जे काही केले ते सगळ्यांच्या मनात एक छाप सोडून गेले. मकबुक, पाम सिंग तोमर, द लंच बॉक्स, पिकू आणि हिंदी मीडियम या सारख्या चित्रपटामध्ये केलेल्या दमदार अभिनयाने मनावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवत आहे.

फक्त त्यांच्या चाहते नाही तर अभिनय क्षेत्रातील अनेकांना आजही इरफान खान यांची आठवन येते. अनेकांनी इरफान खान यांच्या आठवणीत अनेक गोष्टी केल्या. त्यात आता आणखी एका मराठी कलाकाराची भर पडली आहे. मराठमोळा अभिनेता ऋषिकेश शेलार हा त्याच्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या नजरेत बसला. तसेच तुला शिकवीन चांगलाच धडा यात अधिपतीच्या भूमिकेने प्रेक्षकांची माने जिंकून घेतली आहेत.

ऋषिकेशच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होते. त्याला अभियनासाठी प्रवृत्त करणारे किंवा अभिनयाचे नकळत धडे देणारे कलाकार म्हणजे इरफान खान. इरफान खान हे ऋषिकेशचे आवडते कलाकार आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ऋषिकेशनं इरफान खान यांना या आयुष्यात भेटू न शकल्याची खंत व्यक्त केली आहे.

आपल्याच विधानाने अडचणीत आलेल्या हसन मुश्रीफांनी दिलगिरी केली व्यक्त !

स्वामी चक्रपाणी यांच्या मागणीवर अभिनेते प्रकाश राज यांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले….

Leave A Reply

Your email address will not be published.